Advertisement

एेरोलीमध्ये फ्लेमिंगो पाहाण्यासाठी बोट राईड!


एेरोलीमध्ये फ्लेमिंगो पाहाण्यासाठी बोट राईड!
SHARES

मुंबई-नवी मुंबईतील खाडींवर दरवर्षी आॅक्टोबर ते मार्चदरम्यान परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो येतात. या परदेशी पाहुण्यांना बघण्याची, त्यांना न्याहळण्याची आणि कॅमेऱ्यात कैद करण्याची बऱ्याच मुंबईकरांना हौस असते. त्यामुळे मुंबईकर शिवडी, धारावी निसर्ग उद्यान, ऐरोली खाडी अशा खाडींवर फ्लेमिंगो बघायला जातात. पण खाडीत उतरून फ्लेमिंगो बघण्यासाठी बोटीसारखी इतर कोणतीही व्यवस्था अद्याप नसल्यानं पक्षीप्रेमींना आणि पर्यटकांना लांबूनच उभं राहून फ्लेमिंगो बघावे लागतात.


१ फेब्रुवारीपासून सुरु होणार फ्लेमिंगो राईड!

आता मात्र फ्लेमिंगो अगदी जवळून बघण्याची संधी मुंबईकर-नवी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई कांदळवण कक्षानं यासाठी पुढाकार घेत फ्लेमिंगो बोट राईड सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही सेवा १ फेब्रुवारीपासून सेवेत दाखल होणार असल्याची माहिती कांदळवण कक्षातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. ऐरोली खाडी येथे ही सेवा राबवण्यात येत असून १ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता या सेवेचा शुभारंभ होणार आहे.

ऐरोली खाडी येथे कांदळवण कक्षानं एेरोली कोस्टल अॅण्ड मरीन बायो डायव्हर्सिटी सेंटर बांधलं आहे. या सेंटरमध्ये फ्लेमिंगोसह इतर पक्ष्यांसदर्भातील प्रदर्शन पाहायचं आणि मग फ्लेमिंगो बोट राईडचा आनंद घ्यायचा, असा बेत आता अनेकांना आखता येणार आहे!



राईडसाठी दोन बोटींची खरेदी

फ्लेमिंगो बोट राईड सेवेसाठी मुंबई कांदळवण कक्षानं दोन बोटी खरेदी केल्या असून ही सेवा कांदळवण कक्षाकडूनच कार्यान्वित करण्यात येणार आहे. कांदळवण कक्षातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन बोटींमध्ये एक बोट ७ प्रवासी क्षमतेची तर एक बोट २४ प्रवासी क्षमतेची आहे.


कसं असेल वेळापत्रक?

सोमवार ते शुक्रवारदरम्यान प्रत्येकी रू. ३०० तर शनिवार-रविवारसाठी ४०० रुपये तिकीट असून यात ४५ मिनिटांची सफर करता येणार आहे. तर १ तासाची सफर करायची असेल, तर संपूर्ण बोट ५००० रुपयांत भाड्यानं घेता येणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत ही सेवा सुरू राहणार असून भरतीच्या वेळेप्रमाणे वेळेतही बदल केला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा