Advertisement

Shops in Maharashtra: दुकानं व बाजारपेठांच्या वेळेत वाढ


Shops in Maharashtra: दुकानं व बाजारपेठांच्या वेळेत वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू केलं. मात्र, अनलॉक 1.0 च्या अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बाजारपेठ व दुकानं उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळं अनेक दुकानदारांना दिलासा मिळाला. अशातच आणखी एक दिलासादायक निर्णय राज्य सरकारनं मंगळवारी घेतला. राज्य सरकारनं दुकान व बाजारपेठ पुन्हा सुरु करतेवेळी निश्चित वेळ दिली होती. परंतु, आता या वेळेत वाढ केली आहे.

राज्य सरकारनं दूकानं व बाजारपेठ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, केवळ कन्टेनमेंट झोनच्या बाहेरील दुकानांना परवानगी दिली आहे. हा निर्णय मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात घेण्यात आला आहे. बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुकानं व बाजारपेठांना गर्दी व अन्य प्रोटोकॉल लक्षात घेत दुकान चालविनण्यास परवानगी दिली जाणार आहे. सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन न केल्यास संबंधित परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात येतील.

राज्यात सलग ५ व्या दिवशी ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून मंगळवारी ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे.

मंगळवारी कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख  ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा