Advertisement

SRA घरांची विक्री आता 5 वर्षांनंतर करता येणार

10 वर्षांचा नियम रद्द करण्यात आला आहे.

SRA घरांची विक्री आता 5 वर्षांनंतर करता येणार
SHARES

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (SRA) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून 5 वर्षे करण्यात आला आहे.

याबाबतचे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा,  निर्मूलन व पुनर्विकास ) (दुसरी सुधारणा) विधेयक 2023 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. 

एसआरएतील घरांच्या विक्रीबाबत कालावधी कमी करण्याची मागी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि अनेक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यावर आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 

राज्याचे मंत्री अतुल सावे म्हणाले, 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत एसआरएतील घरविक्री कालावधी 5 वर्ष करण्याचा  सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. आज दोन्ही सभागृहात याबाबतचे विधेयक संमत करण्यात आले.

राज्यातील आणि प्रामुख्याने मुंबईतील सुमारे 2.50 लक्ष सदनिका धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात सदनिका धारकांच्या आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आळा बसेल अशी ही माहिती मंत्री सावे यांनी यावेळी दिली.



हेही वाचा

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येण्याची शक्यता

मुंबईतील जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकार लवकरच पावले उचलणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा