Advertisement

उपनगरातील सर्वच रुग्णालयांमध्ये आता ‘बर्न सेंटर’


उपनगरातील सर्वच रुग्णालयांमध्ये आता ‘बर्न सेंटर’
SHARES

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि कस्तुरबा रुग्णालयांसहित उपनगरातील केवळ पाचच रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष आहे. उपनगरात भाजलेल्या रुग्णांच्या उपचाराकरीता पुरेशा सोई नसल्याने येथील सर्वच रुग्णालयांमध्ये आता ‘स्टँड अलोन बर्नस् सेंटर’ची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेची केईएम, शीव आणि नायर या शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालये आहेत. त्यातील केईएम, शीव आणि पाच उपनगरीय रुग्णालयांमध्येच केवळ भाजलेल्या रुग्णांसाठी विशेष कक्ष आहेत. या सर्व ठिकाणी एकूण 116 खाटा उपलब्ध आहेत. कांदिवलीतील कस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांसाठी 25 खाटांचे विशेष कक्ष 'रेफरल सेंटर' 1991 पासून सुरू करण्यात आले. यामध्ये आता महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयातून पाठवण्यात येणाऱ्या 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णांना सामावून घेतले जाते. कस्तुरबा विभागातील या बर्न विभागात दोन खाटा अग्निशमन दलासाठी राखीव आहेत. परंतु त्याही अपुऱ्या ठरत आहेत.


भाजलेल्या रुग्णांवर विशेष उपचार

केईएम, शीव या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये तसेच कस्तुरबा रुग्णालय आणि इतर 5 उपनगरीय रुग्णालयातील विशेष बर्न विभागात सर्व आवश्यक अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने भाजलेल्या रुग्णांवर विशेष उपचार करण्यात येतात. यासाठी सर्जन्स, प्लास्टिक सर्जन्स, नेफ्रॉलॉजिस्ट यांना गरजेनुसार बोलावून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जातात.



शीव रुग्णालयातील बर्न सेंटरचे होणार विस्तारीकरण

देशातील पहिली त्वचा पेढी ही महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय अर्थात शीव रुग्णालयात सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या या रुग्णालयात 14 खाटांचा विशेष बर्न विभाग आहे. त्या विभागाचे विस्तारीकरण करण्याचा विचार सुरू असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले.


कस्तुरबात प्लॅस्टिक सर्जरी विभाग

कस्तुरबा रुग्णालयातील विशेष कक्ष असलेल्या रेफरल सेंटरमध्ये असलेलया 25 खाटांच्या संख्येत वाढ करून आता विभागात अतिरिक्त 5 खाटा वाढवण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दर्जेदार उपचार सेवा देण्याच्या दृष्टीने सुघटन शल्य विभाग (प्लास्टिक सर्जरी युनिट) स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले.


महापालिकेच्या रुग्णालयांमधील भाजलेल्या रुग्णांसाठीच्या खाटा


रुग्णालयखाटा
केईएम रुग्णालय12
शीव रुग्णालय12
कस्तुरबा25
5 उपनगरीय रुग्णालय55




हे देखील वाचा - 

पावसाळी आजारांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये सज्ज



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा