Advertisement

कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार - महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची औरंगाबादचे पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत, आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार - महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ
(File Image)
SHARES

मशिदींवरील भोंगे हटवण्याचा राज ठाकरेंचा तिसऱ्या अल्टिमेटमनंतर राज्य सरकारसह आता पोलिस विभागही कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने मनसे कार्यकर्त्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणाबाबत बोलताना महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ म्हणाले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची चौकशी करत आहेत. आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

औरंगाबाद पोलिसांनी काही अटींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्यास परवानगी दिली होती. ज्यामध्ये कोणत्याही धर्म किंवा समुदायाला दुखावले जाईल अशा गोष्टी न बोलण्याच्या अटी होत्या. मात्र, आता पोलीस राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई तसेच मुंबई पोलिसांनी मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीस दिल्या आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सांगलीत राज ठाकरेंविरोधात अजामिन पात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलं आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा