Advertisement

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बसला अपघात, एक ठार, ३० जखमी

मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० पेक्षा जास्त डॉक्टर जखमी झाले आहेत.

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बसला अपघात, एक ठार, ३० जखमी
SHARES

काही दिवसांपूर्वी पावसाळी सहलीला निघालेल्या दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० पेक्षा जास्त डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून या सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कुठल्या विभागातील डाॅक्टर?

मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल.मधील रेडिएशन ओन्काॅलॉजी तसंच सर्व विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीमला औरंगाबाद येथे कॉन्फरन्ससाठी जात होती. त्याच वेळेस अहमदनगर शहराजवळील केडगाव बायपासवर रोडवर या बसला अपघात झाला. या बसमध्ये एकूण ४० डॉक्टर होते. हे सर्व डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ आहेत.



कधी झाला अपघात?

रेडिएशन ओन्काॅलॉजी व इतर वेगवेगळ्या विभागात ते कार्यरत असून औरंगाबादमध्ये होणाऱ्या एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते. पहाटे पावणेचार वाजता केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस एका कंटेनरला पाठीमागून धडकली. त्यात डॉ. पुष्कर इंगळे, डाॅ. अनिल टिबडेवाल, डाॅ. जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले. जखमी डाॅक्टरांना नगरमधील खासगी मक्सकेअर हब रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

२८ जुलैला महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले. त्यातील एक कर्मचारी सुदैवाने या अपघातातून बचावला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा