Advertisement

ठाण्यातील कोपरी पूल लष्कराने बांधवा, एकनाथ शिंदे यांची मागणी

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तेथील पूलाचं बांधकाम करण्यासाठी लष्कराला पाचारण केलं होतं. लष्कराने विक्रमी वेळेत या पुलाचं बांधकाम करून हा पूल जनतेसाठी खुला केला होता. याच धर्तीवर ठाण्यातील कोपरी पुलाचं काम करावं, अशी मागणी शिंदे यांनी केली.

ठाण्यातील कोपरी पूल लष्कराने बांधवा, एकनाथ शिंदे यांची मागणी
SHARES

ठाणे पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूना जोडणारा तसंच मुंबईहून नाशिक-पुण्याच्या दिशेने जाणारा बहुचर्चित कोपरी पूल धोकादायक अवस्थेत असून त्याची तातडीने पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचं बांधकाम देखील लष्कराने करावं, अशी मागणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. शिंदे यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तेथील पूलाचं बांधकाम करण्यासाठी लष्कराला पाचारण केलं होतं. लष्कराने विक्रमी वेळेत या पुलाचं बांधकाम करून हा पूल जनतेसाठी खुला केला होता. याच धर्तीवर ठाण्यातील कोपरी पुलाचं काम करावं, अशी मागणी शिंदे यांनी केली.

दुरुस्ती का लांबली?

गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा रेल्वे, महापालिका आणि राज्य सरकार यांनी कोपरी पुलाच्या दुरुस्तीकरीता प्रयत्न केले. मात्र पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्याच्या कारणाने ही दुरुस्ती लांबली. अलिकडेच पुलाची धोकादायक स्थिती पाहता परिवहन विभागाने येथील वाहतूक वळवली होती. पुलामुळे मोठी दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्धी माध्यमांकडून विचारला जात होता. तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.

आधीही घडली होती दुर्घटना

याआधी कोपरी पुलाचा काही भाग देखील कोसळला होता. कोपरी पूल मृत्यूचा सापळा ठरत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करणं आवश्यक असल्याने शिंदे यांनी या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करू, असं आश्वासन शिंदे यांना दिलं आहे.

हेही वाचा-

मुंबईतील भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा कमाईत दुसरे

जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास १ वर्षाची मुदतवाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा