Advertisement

2 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा

जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

2 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मुंबई (mumbai), ठाणे (thane) आणि पालघर (palghar) या जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस 'यलो अलर्ट' (yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यात 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जून महिना सुरू होऊनही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सातही धरणांतील पाणीसाठा खालावला आहे.

मुंबईच्या धरणातील पाणीसाठा आता 7 टक्क्यांपेक्षा कमी उपलब्ध आहे. या परिस्थितीमुळे धरणांतील पाणीसाठ्याने मुंबईची चिंता वाढवली आहे.

जून महिन्यात सरासरी 400 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा जून महिन्यात पावसाने आपले तोंड दाखवलेले नाही.

अल् नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत 28 जून रोजी 1 लाख 2 हजार 460 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

15 मे पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र, एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही.

तसेच त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून पाणी कपातीत 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणखी 10 टक्के, अशी एकूण 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मान्सूनने देशातील जवळपास 22 राज्यांना व्यापले आहे. उर्वरित राज्यात 5 जुलैपर्यंत मान्सून बरसण्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

अदानींचा 20 हजार कोटींचा मेगा प्लॅन

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीत मोठा बदल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा