SHARE

मुंबई महापालिकेच्या जी साउथ वॉर्डमधील हाजी अली येथील रेस कोर्स इथं गळती लागलेल्या १६०० मिमी पाण्याच्या पाइपलाइनची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या दुरूस्तीच्या कामामुळं १० आणि ११ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या 'डी' व 'ई' वॉर्डमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दुरूस्तीचं काम

गळती लागलेल्या पाण्याच्या पाइपलाइनच्या दुरूस्तीचं काम १० ऑक्टोबर म्हणजे गुरूवारी सकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येमार आहे. तसंच, हे काम शुक्रवारी सकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कामामुळं डी आणि ई वॉर्डमध्ये २४ तास पाणी कपात राहणार आहे

या विभागात पाणीकपात

  • डी तुकाराम जावजी रोड, ताडदेव रोड, साने गुरूजी मार्ग
  • तुळसीवाडी रोड, आंबेडकर नगर, मुंबई सेंट्रल 
  • महालक्ष्मी रेल्वे स्थानक, स्लेटर रोड, ताडदेव
  • जे.जे. रुग्णालय, नायर रुग्णालयहेही वाचा -

आरेतील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तुर्तास स्थगिती

राज्याभरात ५ दिवस ढगाळी हवामानासह वादळी पावसाचेसंबंधित विषय
ताज्या बातम्या