२०१९च्या पोलिस शिपाई भरतीत अमुलाग्र बदल

मुंबईसह राज्यभरातील तरुणांचं लक्ष लागलेल्या पोलिस शिपाई भरती २०१९च्या स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या पोलिस भरतीची सुरूवात शारीरिक चाचणी ऐवजी लेखी परीक्षेने करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.

SHARE

मुंबईसह राज्यभरातील तरुणांचं लक्ष लागलेल्या पोलिस शिपाई भरती २०१९च्या स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या पोलिस भरतीची सुरूवात शारीरिक चाचणी ऐवजी लेखी परीक्षेने करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. पोलिस भरतीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं पहिल्यांदाच घडणार आहे. यासोबतच शारीरिक चाचणीतही काही बदल करण्यात आले असून, शंभर मार्कांची परीक्षा आता ५० मार्कांची झाली आहे. यातून पुढे मेरिट लिस्टवर पोलिस शिपाई भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.


पहिल्यांदा शारीरिक, नेतर लेखी

राज्यभरात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेत गृह विभागानं यंदा अमुलाग्र बदल केले आहेत. यंदाच्या भरतीत शारीरिक चाचणीऐवजी प्रथम लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यापूर्वी पोलिस भरतीत प्रथम शारिरीक, मग लेखी परीक्षा आणि शेवटी तोंडी मुलाखत घेतली जात होती. मात्र भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन गृह विभागाने शारिरीक आणि लेखी परीक्षा आधी घेण्याचं ठरवलं आहे. या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षीत तरुणांची संख्याही खूप असते. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या दिवसांमध्येही वाढ होत असल्याने पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात असायचा. त्याच बरोबर राज्यभरातील खेड्यापाड्यांतून येणाऱ्या उमेदवारांचीही हेळसांड व्हायची.


असं असेल परीक्षांचं स्वरूप

यंदाच्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मधील नियम ४ चे उपखंड (१), (२), (३) यांमध्ये सुधारणा करत, लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड पुढे शारिरीक चाचणीसाठी केली जाणार आहे. यंदा लेखी परीक्षेत फार काही बदल करण्यात आलेले नाहीत. लेखी परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयांवर १०० मार्कांचा पेपर असेल. पूर्वी शंभर मार्कांसाठी होणारी शारीरिक चाचणी परीक्षा यावेळी ५० मार्कांची राहणार आहे. त्यामध्ये पुरूष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणं (३० गुण), १०० मीटर धावणं (१० गुण), गोळा फेक (१० गुण) असे शारीरिक चाचणीचं स्वरूप आहे. तर महिलांसाठी ८०० मीटर धावणं (३० गुण), १०० मीटर धावणं (१० गुण), गोळा फेक (१० गुण) असं या परीक्षेचं स्वरूप राहील.


अशी होईल निवड प्रक्रिया

यंदाच्या पोलिस भरतीत ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांची भरती असेल, त्या ठिकाणी असलेल्या जागांच्या १:५ प्रमाणात म्हणजे ५० जागा असतील तर त्यासाठी ५० x ५ असे २५० विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील. त्यामुळं जे विद्यार्थी लेखी परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करतील, त्यांनाच या भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळू शकते. यामुळे आता उमेदवारांना शारीरिक चाचणी पेक्षा लेखी परिक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.


हेही वाचा - 

धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत कोठडी

फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागातसंबंधित विषय
ताज्या बातम्या