Advertisement

तूरडाळ स्वस्त झाली हो...! रेशनवर ३५ रुपये दरानं मिळणार


तूरडाळ स्वस्त झाली हो...! रेशनवर ३५ रुपये दरानं मिळणार
SHARES

राज्यातल्या रेशनिंग दुकानातून तूरडाळ विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशनिंग दुकानातून ५५ रुपये प्रति किलोनं विकली जाणारी तूरडाळ आता ३५ रुपये प्रति किलोनं विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 



कर्नाटक, तामिळनाडूत सर्वात स्वस्त

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात तूरडाळ अनुक्रमे ३० रुपये आणि ३८ रुपये प्रति किलोनं विकली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातही या राज्यांप्रमाणे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूरडाळची विक्री कमी दरात करण्यात येणार आहे.


 
राज्य पणन महासंघाकडून विक्री

शासनाकडून ज्या विभागात सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्थांद्वारे होणारी तूरडाळीची विक्री अाता पुढील आदेश येईपर्यंत फक्त राज्य पणन महासंघाकडूनच होईल. शासकीय दरानं ही तूरडाळ खरेदी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

इट्स आमलिशियस! आंब्याचे तब्बल १५० पदार्थ!

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा