Advertisement

बोरिवली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची गजबज वाढली

गेल्या महिन्याभरात सुमारे २८ ते ३० हजार पर्यटकांनी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली आहे.

बोरिवली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची गजबज वाढली
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभराच लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं सर्व दुकानं, उद्यानं, व्यवसाय बंद होते. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं. त्यानंतर अनेक सुविधा सुरू झाल्या अशातच डिसेंबरच्या मध्यावर बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर हळूहळू पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या कान्हेरी लेणी वगळता उद्यानातील सर्व उपक्रम सुरू असून, गेल्या महिन्याभरात सुमारे २८ ते ३० हजार पर्यटकांनी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये सुमारे साडेआठ महिने बंद असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १५ डिसेंबरपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले. त्यापूर्वी १५ ऑक्टोबरपासून केवळ प्रभातफेरीसाठी सकाळी मर्यादित वेळेत राष्ट्रीय उद्यान सुरू करण्यात आले होते. राष्ट्रीय उद्यान डिसेंबरमध्ये पर्यटकांसाठी खुले करताना व्याघ्र आणि सिंहविहार, नौकाविहार, वनराणी (मिनी ट्रेन) हे उपक्रम बंदच ठेवण्यात आले. शिवाय, याकाळात टप्प्याटप्प्यानं सर्व उपक्रम सुरू करण्यात आले.

सध्या आठवड्याला सुमारे ७ ते ८ हजार पर्यटक उद्यानात येत आहेत. त्यामुळं प्रवेश शुल्कापोटी सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचा महसूल उद्यानास मिळलं. हा महसूल कोरोनापूर्व काळाइतका नसला तरी प्रतिसाद चांगला आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईकरांबरोबरच बाहेरून आलेल्या पर्यटकांचेही आकर्षणाचे ठिकाण आहे. 



हेही वाचा -

रेल्वेतील 'सीसीटीव्ही कॅमेरा'साठी १० लाखांची तरतूद

एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये २५ रुपयांची वाढ


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा