Advertisement

मरिन ड्राइव्हवर झाडांना घातले रेनकोट


मरिन ड्राइव्हवर झाडांना घातले रेनकोट
SHARES

पावसात जिथं झाडं ताजीतवानी होतात, तिथं मरिन ड्राइव्हमधील झाडं पावसाळ्यात मान टाकायला लागली आहेत. मरिन ड्राइव्हच्या समुद्रातील उंचच उंच लाटांमुळे या झाडांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील मिठयुक्त पाणी झाडांच्या पानांवर पडतं असल्याने क्षारयुक्त पाणी झाडांच्या मुळाशी जाऊन झाडं मरायला लागली अाहेत. त्यामुळे लाटांपासून वाचण्यासाठी या झाडांना रेनकोट अर्थात जाळी गुंडाळण्याची नामी शक्कल महापालिकेने लढवली आहे. 


काळजी घेण्याची गरज

पर्यावरणाचं संवर्धन आणि सुशोभीकरण या दोन प्रमुख उद्देशांने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी झाडे लावली जातात. याच अंतर्गत रस्त्यांवरील दूभाजकांमध्येही रोपटी लावली जातात. मात्र, समुद्रकिनाऱ्याजवळ अशी रोपटी लावतान ती रोपटी 'सॉल्ट स्प्रे' च्या टप्प्यात येत असतील, तर त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. दक्षिण मुंबईतील नेताजी सुभाष मार्गावरील (मरिन ड्राईव्ह) पोलिस जिमखान्यासमोरील समुद्रकिनाऱ्याचा भाग हा 'सॉल्ट स्प्रे'चा टप्पा आहे.


सॉल्ट स्प्रेचा परिणाम

मरिन ड्राईव्ह पोलिस जिमखान्यासमोरील वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे पावसाळ्यादरम्यान समुद्राच्या लाटा देखील अधिक वेगाने येऊन या ठिकाणच्या किनाऱ्यावर फुटतात. त्यामुळे या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे सूक्ष्म तुषार म्हणजेच 'सॉल्ट स्प्रे' मोठ्या प्रमाणात तयार होऊन ते वाऱ्यासोबत जवळपासच्या परिसरात पसरतात. ज्यांचा प्रतिकूल परिणाम झाडांवर होत असल्याचं; तसंच 'सॉल्ट स्प्रे'च्या माऱ्यापुढे झाडांची रोपटी माना टाकत असल्याचंही महापालिकेच्या उद्यान विभागाच्या यापूर्वी निदर्शनास आलं होतं.


हिरवी जाळी बसवली

गेल्या वर्षी झाडांच्या रोपट्यांना प्रायोगिक स्वरुपात हिरवी जाळी बसविण्यात आली होती. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर या वर्षी 'सॉल्ट स्प्रे'च्या टप्प्यातील १२० झाडांना 'हिरवी जाळी' बसविण्यात आली आहे. या जाळीमुळे 'सॉल्ट स्प्रे'चा रोपट्यांवर होणारा प्रतिकूल परिणाम कमी झाला आहे, अशीही माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.



हेही वाचा -

मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी

मुलुंड पोस्ट ऑफिसच्या जागेवरून शिवसेनेची भाजपावर कुरघोडी





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा