Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी


मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शुक्रवारी २२ जूनला डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रविंद्र कुलकर्णी हे माटुंग्यातील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) चे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत.

डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी ही नियुक्ती केली. गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी प्र-कुलगुरु पद डॉ. विष्णु मगरे सांभाळत असून नुकतीच
कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



मला नुकतंच राज्यपालांकडून प्र-कुलगुरूपदाच्या नियुक्तीचं पत्र आलं अाहे.  मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला असून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेले निकाल गोंधळ, वेळापत्रक गोंधळ अादी सुरळीत करून नॅकमध्ये झालेली घसरण सुधारण्याचा प्रयत्न मी करणार आहे.  कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी बोलणे झाल्यानंतर मी लगेचच प्र-कुलगुरू पदाचा पदभार स्विकारेन.
 -  डॉ. रविंद्र कुलकर्णी



हेही वाचा- 

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसूफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा टेकगिग हॅकथॉनमध्ये विजय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा