एका माशाने 'त्याला' बनवलं लखपती!

स्थानिक मच्छिमारांच्या मते, लहान आकाराचा घोळ मासा देखील सरासरी ८ ते १० हजार रुपयांना विकण्यात येतो. याअगोदर एका मच्छिमाराने पकडलेल्या घोळ माशाची ५.१६ लाख रुपयांना विक्री झाली होती.

एका माशाने 'त्याला' बनवलं लखपती!
SHARES

श्रावण जवळ येत असल्याने सध्या मासळी बाजारात गिऱ्हाईकांची संख्या रोडावली आहे. त्याचा मासे विक्रेत्यांच्या कमाईवरही परिणाम होऊ लागला आहे. पण पालघरमधील एका मच्छिमारावर नशीबाने इतकी कृपा केली केली की केवळ एक मासा विकून तो चक्क लखपती बनला. होय. हे खरं आहे.


'असा' झाला फायदा

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मेहर नावाचा मच्छिमार आपला भाऊ भरत याच्यासोबत लहानशी होडी घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात एक मासा लागला. हा मासा बघून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण हा मासा होता ३० किलो वजनाचा घोळ मासा. घोळ मासा दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे हा मासा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ लागली. शेवटी बोलीच्या आधारे एका व्यापाऱ्याने महेश यांच्याकडून ५.५० लाख रुपयांना हा मासा विकत घेतला आहे.


नफा मिळवून देणारा मासा

स्थानिक मच्छिमारांच्या मते, लहान आकाराचा घोळ मासा देखील सरासरी ८ ते १० हजार रुपयांना विकण्यात येतो. याअगोदर एका मच्छिमाराने पकडलेल्या घोळ माशाची ५.१६ लाख रुपयांना विक्री झाली होती.


इतका महाग का?

औषधी गुणांमुळे या माशाला 'सोन्याचं हृदय असलेला मासा' म्हणूनही ओळखलं जातं. हा मासा खाण्यात चविष्ट तर असतोच, पण माशापासून औषधे देखील बनवण्यात येतात. तज्ज्ञांच्या मते घोळ माशाच्या त्वचेत दर्जेदार कोलेजन (प्रथिन घटक) असतात. कोलेजनचा वापर उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ, औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीत करण्यात येतो.

या माशाच्या पंखांचा वापर वाईन शुद्ध करण्यासाठी आणि आॅपरेशनमध्ये टाके घालण्यासाठी करण्यात येतो. यामुळे या माशाची सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग आणि जपानमधून प्रचंड मागणी असते.हेही वाचा-

जेलीफिश येतात कुठून? वाचा येथे

मुंबईच्या चौपाट्यांवर जाताना जपून, आल्यात विषारी जेली फिश!संबंधित विषय