तुम्हीही विकत घेऊ शकता अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद'ची प्राॅपर्टी!


  • तुम्हीही विकत घेऊ शकता अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद'ची प्राॅपर्टी!
SHARE

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात तपास यंत्रणा फास आवळत असतानाच केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही दाऊद विरोधातील मोहीम जलद केली आहे. दाऊदच्या दक्षिण मुंबईतील मालमत्तां(प्राॅपर्टी)चा लिलाव करण्यासाठी महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे.


'या' प्राॅपर्टीचा समावेश

महसूल विभागाने दिलेल्या जाहिरातीत दाऊदची भेंडी बाजारातील 'शबनम गेस्ट हाऊस' नावाची दुमजली इमारत, पाकमोडिया आणि याकूब स्ट्रीटवरील डामरवाला इमारतीतील १८ ते २०, २५, २६, २८ क्रमांकाची घरं तसच पाकमोडिया स्ट्रीटवरील हॉटेल रौनक अफरोज या प्राॅपर्टीचा समावेश आहे.'येथे' होणार लिलाव

जाहिरातीनुसार चर्चगेट येथील आय.एम.सी. इमरतीतील किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये १४ नोव्हेंबरला हा लिलाव होणार असून एकाच वेळी या प्राॅपर्टीचा जाहीर लिलाव तसेच ई- ऑक्शन त्याचबरोबर बंद लिफाफ्याद्वारे लावण्यात आलेली बोली जाहीर केली जाईल.


सगळ्यात मोठी बोली लावणाऱ्याला...

महसूल विभागाने प्रत्येक प्राॅपर्टीसाठी एक आधारभूत किंमत ठरवली असून सगळ्यात मोठी बोली लावणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ही प्राॅपर्टी केली जाईल. याआधी देखील दाऊदच्या मुंबईतील प्राॅपर्टीचा जाहीर लिलाव करण्यात आला होता.

१९९३ सालच्या मुंबई साखळी स्फोटातील दाऊद इब्राहिम हा मुख्य आरोपी असून दाऊद सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे. १९९३ च्या मुंबई स्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून जास्त नागरिक जखमी झाले होते.हेही वाचा -

'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?

अखेर दाऊद इब्राहिम विरोधात मुंबईत गुन्हा दाखल!


संबंधित विषय
ताज्या बातम्या