Advertisement

मुंबईतील 'या' चौपाटीवर होणार दर्शक गॅलरी

मुंबईकरांना समुद्राच्या भरती-ओहोटी व अन्य दृश्यांचा आनंद लुटता यावा यासाठी ही गॅलरी बनविण्यात येणार आहे.

मुंबईतील 'या' चौपाटीवर होणार दर्शक गॅलरी
SHARES

मुंबईतील दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरी बनविण्यात येणार आहे. मुंबईकरांना समुद्राच्या भरती-ओहोटी व अन्य दृशांचा आनंद लुटता यावा यासाठी ही गॅलरी बनविण्यात येणार आहे. मात्र, काही कारणात्सव ही गॅलरीचं काम रखडलं होत. परंतू, आता दर्शक गॅलरीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून लवकरच मुंबईकरांना या गॅलरीत उभे राहून वरळीपासून थेट वांद्र्यापर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहेत.

या दर्शक गॅलरीसाठी कंत्राटदार नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडं पाठवण्यात आला आहे. शिवाय, या कामासाठी एकूण साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. ८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागच्या बाजूस समुद्रकिनाऱ्यावर पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीनं एक दर्शक गॅलरी उभारण्यात येणार आहे. 

दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक पातमुख जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. सध्या गिरण्या बंद पडलेल्या असल्यामुळं हे पातमुख वापरात नाही. ते तुटलेल्या अवस्थेत आहे. परंतु, दादर चौपटीवर येणारे अनेक जण यावर बसतात, सेल्फी घेतात, फोटो काढतात. त्यामुळं याच जागी दर्शक गॅलरी उभारण्याचा पालिकेचा विचार आहे.

समुद्राच्या भरती-ओहोटीचा विचार करून ही गॅलरी उंचावर बांधण्यात येणार आहे. त्यामुळं पावसातही पर्यटकांना लाटांचा आस्वाद घेता येणार आहे. या गॅलरीला उतारही ठेवण्यात येणार असून अपंगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही या गॅलरीत येता येणार आहे.



हेही वाचा -

Budget 2021- Income Tax Slab: नोकरदारांच्या पदरी निराशा, भरावा लागणार ‘इतका’ इन्कम टॅक्स!

Budget 2021: जुन्या गाड्या भंगारात निघणार, वाचा, सरकारची नवी पाॅलिसी आहे तरी काय?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा