Advertisement

प्लास्टिक मुक्त मुंबई करण्याचा निर्धार...


प्लास्टिक मुक्त मुंबई करण्याचा निर्धार...
SHARES

26 जुलै 2005... मुंबईकरांना ही तारीख नक्कीच आठवत असेल. याच दिवशी मुंबापुरीची तुंबापुरी झाली होती. अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले होते. 26 जुलै रोजी मिठी नदी भरण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मिठीतला गाळ आणि विशेष करुन मिठीत टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या. मात्र, पुन्हा मुंबईकरांवर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मुंबई प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार 'व्हॉईस ऑफ कलिना एएलएम'ने केला आहे. यासाठी 'व्हॉईस ऑफ कलिना' एएलएमच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळा, 'मुंबई वाचवा' अशी जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. 

मुळात 'व्हॉईस ऑफ कलिना' एएलएमची स्थापना जुलै 2011 साली झाली. तेव्हापासून कलिना परिसरातील स्वच्छता आणि इतर सामाजिक प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे काम 'व्हॉईस ऑफ कलिना एएलएम' करत आहे. परिसरातील पाण्याची समस्या असो, फेरीवाल्यांचा त्रास असो किंवा स्वच्छता असो, या सर्व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या 'व्हॉईस ऑफ कलिना'ने प्लास्टिक मुक्त मुंबईसाठी आवाज उठवल्याची माहिती 'व्हॉईस ऑफ कलिना'चे अध्यक्ष लॉय डायस यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


हेही वाचा - 

मिठीची परिस्थिती आजही जैसे थे!

मिठीला फेरीवाल्यांचा विळखा

मिठी नदी प्रदूषित, फक्त किनारेच करणार सुशोभित


जे मुंबईकर मुंबईला सुंदर आणि स्वच्छ ठेवणार असतील, त्यांच्या पाठिशी मनपा नक्की राहील. जर लोकसहभागातून चांगली कामे होत असतील, तर त्यातून नक्कीच शहराचा विकास होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई प्लास्टिकमुक्त करण्याकडे पालिकेचा कल आहे. त्यासाठी आता 'व्हॉईस ऑफ कलिना' एएलएमनेदेखील पुढाकार घेतला आहे. 

सुभाष पाटील, अधिकारी, व्हॉईस ऑफ कलिना एएलएम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा