Advertisement

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्टचा पादचारी पूल बंद

हार्बर रेल्वे मार्गावरील वडाळा स्थानकातला पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल दुरुस्तीच्या कामसाठी बंद करण्यात आला आहे. सोमवारपासून वडाळ्याचा पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल बंद करण्यात आल्यानं पूर्व ते पश्चिम जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

वडाळ्यातील पोर्ट ट्रस्टचा पादचारी पूल बंद
SHARES

हार्बर रेल्वे मार्गावरील वडाळा स्थानकातला पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल दुरुस्तीच्या कामसाठी बंद करण्यात आला आहे. सोमवारपासून वडाळ्याचा पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल बंद करण्यात आल्यानं पूर्व ते पश्चिम जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


धोकादायक पुलांची दुरूस्ती

सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं जुन्या आणि धोकादायक पुलांच्या दुरूस्तीची काम हाती घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील तर, मध्य रेल्वेच्या कल्याण, दिवा, कुर्ला, भांडुप, विक्रोळी स्थानकातील ब्रिटीशकालीन पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले आहेत. 


महत्वाची स्थानकंं

घाटकोपर आणि कुर्ला ही २ स्थानकं मध्य रेल्वेची आणि वडाळा स्थानक हे हार्बर मार्गावरील महत्वाचं स्थानक आहे. त्यामुळं या स्थानकांतील पादचारी पूल बंद करण्यात आल्यानं प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत आहे. 



हेही वाचा -

कार्यकर्त्यांमधील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल

बंगळुरु पुन्हा पराभूत, मुंबईचा ५ गडी राखून विजय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा