Advertisement

वीजपुरवठा खंडित झाल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम

मुंबईत सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं अनेक यंत्रणांना त्याचा फटका बसला.

वीजपुरवठा खंडित झाल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम
SHARES

मुंबईत सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं अनेक यंत्रणांना त्याचा फटका बसला. मुंबई लोकलपासून रुग्णालय, शाळा, इंटरनेट यांसारख्या सर्वच यंत्रणांना त्याचा फटका बसला. त्याशिवाय, मुंबईच्या अनेक भागात सोमवारी रात्री उशिरा पाणी आल्यानं नागरिकांची गैरसोय झाली. 

सोमवारी तब्बल २ तासांनंतर विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याचं पंपीग सुरू करण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. दरम्यान, रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी मंगळवारी दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने नमूद केले आहे. नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. तब्बल साडेतीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र याचा खूप मोठा फटका अनेक सेवांना बसला. 



हेही वाचा -

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा