Advertisement

२७ आणि २८ जानेवारी रोजी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.

२७ आणि २८ जानेवारी रोजी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
SHARES

येत्या गुरुवारी (२७ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवारी (२८ जानेवारी) पहाटे ४ वाजेपर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम या विभागांमधील खालील परिसरात १८ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.

एम/पूर्व विभाग  

  • प्रभाग क्रमांक 140 - टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग 
  • प्रभाग क्रमांक 141 - देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड
  • प्रभाग क्रमांक 142 - लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत 
  • प्रभाग क्रमांक 143 - जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर
  • प्रभाग क्रमांक 144 - देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत
  • प्रभाग क्रमांक 145 - सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे
  • प्रभाग क्रमांक 146 - देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत

एम/पश्चिम विभाग 

  •  प्रभाग क्रमांक 151 – साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर
  • प्रभाग क्रमांक 152 - सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर 
  • प्रभाग क्रमांक 153 - घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क
  • प्रभाग क्रमांक 154 - चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; प्रभाग क्रमांक 155 - लाल डोंगर

त्यामुळे सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

तसंच, कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.



हेही वाचा

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, मालाड सर्वाधिक प्रदूषित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा