Advertisement

विलेपार्लेतील विहिरीमध्ये बुडून ३ जणांचा मृत्यू


विलेपार्लेतील विहिरीमध्ये बुडून ३ जणांचा मृत्यू
SHARES

मुलांचं आयुष्य वाढवं म्हणून पूजा करण्यासाठी गेलेल्या २ महिला आणि एका लहान मुलीचा विलेपार्लेतील एका विहिरीत मंगळवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला आहे. विहिरीचा कठडा कोसळल्याने विहिरीजवळ पुजेसाठी बसलेल्या १५ जणी या विहिरीत पडल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्वरित बचाव कार्य सुरू करत १२ महिलांना वाचवलं. तरीही ३ जणींचा बुडून मृत्यू झाला.

कुठं घडली घटना?
मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास विश्वकर्मा समाजाच्या महिला मुलांचं आयुष्य वाढावं या पुजेसाठी दीक्षित रोड वरील रुईया बंगलो, सॅटेलाईट हॉटेल जवळ जमल्या होत्या. या विहिरीवरील लोखंडी जाळ्यांवर बसून महिला पूजा करत होत्या. पुजेचा कार्यक्रम सुरू असतानाच विहिरीचा कठडा कोसळला. यात ३ वर्षांच्या मुलीसह १५ जणी पडल्या.

बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी घाव घेत बचावकार्य सुरू केलं. १२ महिलांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पण २ महिला आणि ३ वर्षांची मुलगी यांचा मात्र मृत्यू झाला.

दरम्यान, वाचवण्यात आलेल्या महिलांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मृतांची नावे 'अशी'
रेणू यादव (२०)
माधवी पांडे (४९)
दिव्या (३)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा