Advertisement

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, 'इतक्या' ट्रेन्स धावणार

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, 'इतक्या' ट्रेन्स धावणार
SHARES

मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. येत्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर 50 एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होण्यास मदत होईल. 

पश्चिम रेल्वे सध्या 96 एसी लोकलच्या फेऱ्या धावत आहेत. या फेऱ्यांमध्ये दररोज सरासरी 1.62 लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. चालू आर्थिक वर्षात एसी लोकलने 3 कोटींहून अधिक प्रवाशांनी आरामदायी आणि गारेगार प्रवासाचा अनुभव घेतला.

एसी लोकलचा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून आणि उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी पाच एसी रेक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडे सध्या 7 एसीचे  रेक असून आणखी 5 वातानुकूलित रेक सुरू केल्यास वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 50 पर्यंत वाढवणे शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

तसेच भारतीय रेल्वेतील पहिली एसी लोकल डिसेंबर 2017 मध्ये पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट –बोरिवली दरम्यान सुरू करण्यात आली. सुरुवातीला या एसी लोकलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिला. पण हळूहळू एसी लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली. तसेच तिकीट दर कमी केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचे प्रवासी संख्या वाढू लागली.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात एसी लोकलच्या प्रवासी संख्येत सुमारे 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एसी गाडीतून 2.32 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता.



हेही वाचा

मुंबई : चर्चगेट-विरार दरम्यान 15 डब्यांची धीम्या लोकल धावणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष्य द्या, विनातिकिट प्रवास करणे महागात पडेल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा