मटण महागणार?


SHARE

मुंबई - देवनार पशुगृहाच्या विविध शुल्कात 25 टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. त्यानुसार जनावरांना गोठ्यात ठेवणं, जनावरांना कापणं, मांस वाहतूक शुल्क अशा विविध सेवांमध्ये वाढ करण्यात आलीय. मुंबई महानगर पालिकेनं हा निर्णय घेतलाय. यासंबंधीचा प्रस्ताव गुरूवारी, 8 डिसेंबरला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणाराय. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास मटणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

पशुगृहाच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं पालिकेनं सेवांवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 2010 नंतर पशुगृहातील शूल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचा पालिकेवर आर्थिक भार पडतोय. ही शुल्कवाढ झाल्यास पालिकेला 2 कोटी 90 लाखांचा अतिरिक्त महसुल मिळणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ