Advertisement

अजिंक्य राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

स्टिव्ह स्मिथला आता आयपीएलच्या राजस्थान राॅयल्स संघानेही कर्णधारपदावरून दूर केलं आहे. स्मिथच्या जागी आता राजस्थान राॅयल्सची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे.

अजिंक्य राजस्थान रॉयल्सचा कर्णधार
SHARES

चेंडू कुरतडण्या (बाॅल टॅम्परिंग) प्रकरणी आॅस्ट्रेलियन संघाचं कर्णधारपद सोडवं लागलेल्या स्टिव्ह स्मिथला आता आयपीएलच्या राजस्थान राॅयल्स संघानेही कर्णधारपदावरून दूर केलं आहे. स्मिथच्या जागी आता राजस्थान राॅयल्सची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे.


का केलं बडतर्फ?

सध्या आॅस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियन बाॅलर कॅमरून बेनक्रॉफ्ट एका पिवळसर वस्तूने चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांनी आपल्या चुकीची कबुली दिली.

या प्रकरणानंतर स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघावर प्रचंड टीका झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी चौकशीचे आदेश तर दिलेच, पण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी स्मिथच्या वर्तनाने ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाल्याचं सांगून स्मिथला कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला.


 

म्हणून अजिंक्यची निवड

आयसीसीने स्मिथवर एक मॅचचा प्रतिबंध आणि १०० टक्के मॅच फी कापण्याचा दंड ठोठावला. तर बॅनक्राॅफ्टवर एक मॅचचा प्रतिबंध आणि ७५ टक्के मॅच फी कापण्याचा दंड सुनावण्यात आला.

यामुळे आपल्या संघाचं मनोबल ढासळू नये म्हणून राजस्थान राॅयल्सच्या मालकांनी स्मिथला कर्णधारपदावरून दूर सारत त्याच्या जागी अजिंक्यची निवड करण्याचं ठरवलं.



हेही वाचा-

स्लेजिंग अन् हाँकिंग माझे नावडते- अजिंक्य रहाणे

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सवर भडकतो तेव्हा...

अायपीएलच्या उद्घाटनाला ६ कर्णधार राहणार गैरहजर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा