Advertisement

फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड (indian cricket team) समितीचे प्रमुख म्हणून माजी क्रिकेटर फिरकी गोलंदाज सुनील जोशी (bowler Sunil joshi) यांची निवड करण्यात आली आहे.

फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख
SHARES

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड (indian cricket team) समितीचे प्रमुख म्हणून माजी क्रिकेटर फिरकी गोलंदाज सुनील जोशी (bowler Sunil joshi) यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवार निवड समितीची (selection committee) घोषणा केली. या समितीचं नेतृत्व जोशी करणार आहेत. नवी निवड समिती १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी (one day match) भारतीय संघाची निवड करणार आहे. 

हेही वाचा- 'आयपीएल'ला कोरोना व्हायरसचा धोका?

एम.एस.के.प्रसाद (msk prasad) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता. त्यानंतर मुख्य निवड समितीमधील २ पदांसाठी ४४ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अजित आगरकर, नयन मोंगिया यांच्या नावांचाही समावेश होता. मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती (CAC)ने बुधवारी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरविंदर सिंह, वेंकटेश प्रसाद या ५ जणांच्या मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यातून सुनील जोशी यांची निवड समितीचे (bcci selection committee) प्रमख म्हणून करण्यात आली. जोशी विद्यामान निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांची जागा घेतली. तर दुसऱ्या जागेसाठी हरविंदर सिंह यांच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

कर्नाटकचं प्रतिनिधीत्व करणारे फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांनी भारताकडून कसोटी खेळताना १५ कसोटीत ४१, तर ६९ वन डे सामन्यांत ६९ विकेट्स घेतल्या आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांच्या नावावर प्रत्येकी एक अर्धशतकही आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९९ मध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करत ६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा- 'राहुल'च्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका

सुनील जोशी (bowler Sunil joshi) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीत देवांग गांधी, जतीन परांजपे, सरणदीप सिंग आणि हरविंदर सिंग यांचा समावेश असून ही निवड समिती १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा