Advertisement

'राहुल'च्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका

के.एल. राहुल याला कसोटीतून वगळल्यानं बीसीसीआय आणि निवड समितीवर क्रिकेटप्रेमींसह माजी खेळाडूंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

'राहुल'च्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका
SHARES

वर्ल्डकप २०१९ नंतर भारतीय संघात सलामीवीर म्हणून के. एल. राहुल यानं संघाची धुरा सांबाळली. आंतरराष्ट्रीय व मायेदेशी होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये राहुलनं चांगली कामगिरी केली आहे. नुकताच न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत भारतानं न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला. यामध्ये सलामीवीर म्हणून राहुलनं मोलाची कामगिरी केली आहे. मात्र, टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेत राहुलला स्थान देण्यात आलं. परंतु, कसोटीसाठी त्याला संघातुन वगळण्यात आलं. त्यामुळं बीसीसीआय आणि निवड समितीवर क्रिकेटप्रेमींसह माजी खेळाडूंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय संघातील अन्य कोणताही फलंदाजापेक्षा राहुलची कामगिरी सरस असताना देखील त्याला कसोटी संघात स्थान दिलं नाही. मात्र, वनडे आणि टी-२० मधील कामगिरी पाहता राहुलनं कसोटीमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळं निवड समितीनं राहुलला संघात स्थान न देण्यामागे त्याची कसोटीमधील कामगिरीचा विचार केला असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा - मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का

राहुलनं कसोटीमधील मागील १२ डावात एकही अर्धशतक केलेलं नाही. इंग्लंड विरुद्ध ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात १४९ ही त्याची अखेरची सर्वोत्तम खेळी होती. मात्र, मागील १२ डावातील अपयशामुळं सध्या टी-२० आणि वनडेत दमदार कामगिरी करून देखील त्याची कसोटी संघात निवड झाली नाही. त्यामुळं सर्वच स्थरावरून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

भारतीय संघातील केएल राहुलच्या फॉर्मच्या आधारे तो संघात पाहिजे. दुखापतीमुळं सलामीवीर रोहित शर्मा संघाबाहेर असल्यानं त्याची संघातील कमी जाणवते. त्याशिवाय, त्याच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल हे संघाची धुरा सांभाळत असले, तरी फारशी चांगली कामगिरी होत नाही आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे व पहिल्या कसोटी मालिकेत हे दोघही कमी धावा करत माघारी परतले. त्यामुळं संघात रोहित शर्मा नसल्यानं त्याच्याजागी के. एल. राहुलला स्थान देणं गरजेचं आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याला दुखापत झाल्यानं वनडे व टी-२० मालिकेत यष्टीरक्षक म्हणून के. ए. राहुल यष्टीरक्षण करत आहे. त्याचप्रमाणं मधल्या फळीतही राहुल चांगली खेळी करतो. त्यामुळं भारतीय संघाला फलंदाजीसाठी के. एल. राहुलचा आधार होता.

हेही वाचा - 'गब्बर' धवनला लागलेलं दुखापतीचं ग्रहण काही सुटेना

राहुलनं टी-२० मालिकेत ५६च्या सरासरीनं २२४ धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. तर पहिल्या वनडेत देखील त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. पाचव्या क्रमांकावर येवून राहुलने ६४ चेंडूत ८८ धावा केल्या. भारतीय संघातील अन्य कोणताही फलंदाजापेक्षा राहुलची कामगिरी सरस असताना देखील त्याला कसोटी संघात स्थान दिले नाही.

राहुलला संघात स्थान न दिल्यानं माजी कर्णधार कपील देव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 'भारतीय संघात केएल राहुलला स्थान नाही. खर तर फॉर्मच्या आधारे तो संघात हवा. जेव्हा तुम्ही संघ तयार करता तेव्हा खेळाडूंना विश्वासात घेणे गरजेचे असते. तुम्ही अधिक बदल करता तेव्हा त्याला काही अर्थ नसतो. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण तो संघाबाहेर आहे. एखादा खेळाडू जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला प्रत्येक मॅच मध्ये खेळवले पाहिजे’, असं कपील देव यांनी म्हटलं.

हेही वाचा - IPL2020- आयपीएलच्या १३व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर

गतवर्षी सुरू झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. भारतानं ७ कसोटी सामने जिंकत ३६० गुण नावावर के ले आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ आतापर्यंत ८ सामने खेळला असून, ७ सामने जिंकला आहे. तर, एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाच्या या पराभवावर माजी कर्णधार कपील देव यांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा पराभव होईल, अशी चिन्हं दिसत आहेत.



हेही वाचा -

शरीरसौष्ठवपटू 'मुंबई-श्री' किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज

बनावट बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा