Advertisement

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार ८०० कोटींचा फटका

कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षी होणारी किक्रेट टी २० लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धाही रद्द होण्याची शक्यता आहे.

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार ८०० कोटींचा फटका
SHARES

कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षी होणारी किक्रेट  टी २० लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धाही रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव काही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आयपीएल होणं मुश्कील आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआय आणि आयपीएलच्या समभागधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बीसीसीआय आणि आयपीएलच्या समभागधारकांचं तब्बल 3800 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. 

आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. भारतात 21 दिवसांचा लाॅकडाऊन आहे. हा लाॅकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. पण अद्याप कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झालेला नाही. त्यामुळे लॉकडाउन लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयपीएल रद्दच होण्याची चिन्हे आहेत.

आयपीएल रद्द झाल्यास स्टार इंडिया वाहिनीलाही  ३२६९.५० कोटींचा फटका बसणार आहे.  २०१७ साली स्टार इंडियाने आयपीएलच्या टीव्ही आणि डिजीटल प्रसारणाचे जगभरातील हक्क ६,३४७.५० कोटींना विकत घेतले. २०१८ ते २०२२ या कालवधीसाठी हा व्यवहार झाला. त्यामुळे आयपीएल रद्द झाल्यास स्टार इंडियाला एवढा मोठा फटका बसणार आहे. 

बीसीसीआयने आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी विवो कंपनीशी करार केला आहे. विवोने ५ वर्षांसाठी २,००० कोटींना आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व घेतले आहे. त्यामुळे विवोलाही ४०० कोटींचा फटका बसणार आहे.



हेही वाचा -

कोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

बापरे! वरळीत आणखी ५५ कोरोनाग्रस्त सापडले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा