Advertisement

'या' माजी सलामीवीराकडून रोहितला सचिन तेंडुलकरची उपमा


'या' माजी सलामीवीराकडून रोहितला सचिन तेंडुलकरची उपमा
SHARES

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं ८ गडी राखत विजय मिळवला. ३ टी-२० सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघानं १-१ अशी बरोबरीही साधली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात बांग्लादेशनं दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघानं विजय मिळवला.

८५ धावांची खेळी

या सामन्यात रोहित शर्मानं बांग्लादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीवर भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग खुश झाला आहे. विरेंद्र सेहवाग यानं रोहित शर्माला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उपमा दिली आहे.

हेही वाचा - वनडेत २५-२५ षटकांचे २ डाव करा, सचिनचा आयसीसीला सल्ला

सचिनसारखा खेळतोय

'सचिन आपल्या काळात सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचा, जर एखादी गोष्ट मी करु शकतो तर तुम्ही का नाही? मात्र त्याला हे कधीच समजलं नाही की जे देवाला जमतं ते कोणालाही जमत नाही. रोहित सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनसारखा खेळतोय. सध्या तो ज्या पद्धतीनं खेळतोय त्याच्यासारखा खेळ कोणत्याही खेळाडूला जमणार नाही’, असं विरेंद्र सेहवाग यानं Cricbuzz संकेतस्थळाच्या एका कार्यक्रमात म्हटलं. त्याशिवाय 'एका षटकात ३-४ षटकार ठोकायचे आणि ४५ चेंडूत ८०-९० धावा करायच्या ही एक कला आहे. विराट कोहलीलाही रोहितसारखं सातत्याने खेळ करणं जमणार नाही’, असंही सेहवागनं म्हटलं.

हेही वाचा - रोहीत शर्मा करणार टी -२० मध्ये नवा विक्रम

११८ धावांची भागीदारी

या सामन्यात रोहित शर्मा याला शिखर धवननं ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

रो'हिट'मॅनच्या भारतीय संघानं घडवला 'हा' इतिहाससंबंधित विषय
Advertisement