Advertisement

'इतक्या' देशांत आयपीएल सामन्यांचं थेट प्रक्षेपण

आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे आहेत. भारतामध्ये हिंदी, इंग्लिशसह सहा प्रादेशिक भाषांमध्ये सामन्यांचे समालाेचन केलं जाणार आहे.

'इतक्या' देशांत आयपीएल सामन्यांचं थेट प्रक्षेपण
SHARES

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३ वा हंगाम दुबईमध्येमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतासह १२० देशांमध्ये हाेणार आहे. मात्र, यातून पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये सामन्यांचं थेट प्रक्षेपण हाेणार नाही.

आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे आहेत. भारतामध्ये हिंदी, इंग्लिशसह सहा प्रादेशिक भाषांमध्ये सामन्यांचे समालाेचन केलं जाणार आहे. जाईल. यामध्ये तामिळ, मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळ भाषांचा समावेश आहे. मात्र, यासाठी प्रीमियम मेंबरशिपची आवश्यकता असेल. इंग्लंड-आयर्लंड येथील चाहत्यांना स्काय स्पाेर्ट्स, अमेरिका-कॅनडामध्ये विलाे टीव्ही आणि आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये फाॅक्स स्पाेर्ट्स वाहिनीवर आयपीएल सामन्यांचे प्रक्षेपण हाेणार आहे.

आयपीएल स्पर्धा १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामने पाहता येणार नाहीत. स्टेडियम पुर्णपणे रिकामे असल्याने खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजवीज केली जाणार आहे. संघमालक मोकळ्या मैदानात अतिरिक्त स्क्रीनची व्यवस्था करणार असून यावर प्रेक्षकांच्या रेकॉर्ड केलेल्या भावमुद्रा आणि चिअर लिडर्स यांचे व्हिडिओ दाखवले जातील. विकेट पडल्यावर, चौकार-षटकार खेचल्यावर टीव्ही स्क्रीनवर चिअर लिडर्स नाचताना दिसतील.हेही वाचा -

'आयपीएल'चं वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर...

आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement