Advertisement

मुंबईकर रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा


मुंबईकर रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा
SHARES

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी मुंबईकर रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ कौल आणि श्रेयस अय्यरला देखील संधी देण्यात आली आहे. यासोबतच श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या उर्वरीत एका कसोटीसाठी भारतीय संघाची निवड झाली असून त्यात खेळाडूंमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.


...म्हणून विराटला विश्रांती

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली याला विश्रांती देणार यावर चर्चा सुरू होती, त्या चर्चेला शेवटी पूर्णविराम लागला. आयपीएल लीगपासून सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे विराटला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळवले जातील.


भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), अंजिक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, शिखर धवन, हार्दिक पंड्या, महेंद्र सिंह धोनी, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, बुमराह, केदार जाधव, भुवनेश्वर, दिनेश कार्तिक, कुलदीप चहल.हेही वाचा

रोहित शर्माने कोणकोणते नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले? वाचा


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा