Advertisement

शिवाजी पार्क लायन्सची फायनलकडे वाटचाल


शिवाजी पार्क लायन्सची फायनलकडे वाटचाल
SHARES

ब्रविश शेट्टी अाणि शिवम दुबे यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर शिवाजी पार्क लायन्सने वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० मुंबई लीगमधील एलिमिनेटर सामन्यात नमो वांद्रे ब्लास्टर्सला सहा विकेट्सनी धूळ चारून अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली. अाता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी शिवाजी पार्क लायन्सला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सोबो सुपरसोनिक्सशी दोन हात करावे लागतील. नमो वांद्रे ब्लास्टर्सचे १७० धावांचे अाव्हान शिवाजी पार्कने १७.४ षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात पार करून विजेतेपदाच्या अाशा कायम ठेवल्या.


श्रेयस अय्यरचं पाचवं अर्धशतक

सलामीवीर एकनाथ केरकरच्या (२) रूपाने नमो वांद्रे ब्लास्टर्सला दुसऱ्याच षटकांत धक्का बसल्यानंतर श्रेयस अय्यर अाणि अमन खान यांनी वांद्रे ब्लास्टर्सच्या डावाला अाकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. अमन खानने ३६ धावांची खेळी करत श्रेयसला चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजुने विकेट्स पडत असताना श्रेयस मैदानावर ठाण मांडून उभा होता. वानखेडेवर ३ चौकार अाणि तब्बल ७ षटकारांची अातषबाजी करत श्रेयसने ५८ चेंडूंत नाबाद ९१ धावांची खेळी साकारली. सहा सामन्यांतील श्रेयसचे हे पाचवे अर्धशतक ठरले. अय्यरने आक्रमक खेळ करत डावखुरा फिरकी गोलंदाज अल्पेश रमजानीला एकाच षटकात तीन षटकार ठोकले. त्यामुळे नमो वांद्रे ब्लास्टर्सला २० षटकांत ४ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारता अाली. शिवाजी पार्ककडून शम्स मुलानीने दोन विकेटस मिळवल्या.


ब्रविश शेट्टी, शिवम दुबेने मने जिंकली

पाॅल वल्थाटी (२२) अाणि हार्दिक तामोरे (१४) यांनी शिवाजी पार्कला अाश्वासक सुरुवात करून दिल्यानंतर कर्णधार ब्रविश शेट्टीने सामन्याची सर्व सूत्रे अापल्या खांद्यावर घेतली. त्याने अल्पेश रामजानीसह तिसऱ्या विकेटसाठी मोलाची भर घातली. त्यानंतर मात्र ब्रविश अाणि शिवम दुबे यांनी वानखेडेवरील उपस्थितांची मने जिंकली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल ८१ धावा रचत शिवाजी पार्कला विजयासमीप अाणून ठेवले. शिवमने १ चौकार अाणि ६ षटकार ठोकत ५४ धावा तडकावल्या. ब्रविश शेट्टीने अखेरपर्यंत किल्ला लढवत ७ चौकार अाणि २ षटकारांसह नाबाद ५७ धावा फटकावून शिवाजी पार्कला विजय मिळवून दिला.


हेही वाचा -

ट्रम्प नाइट्सची टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा