Advertisement

ट्रम्प नाइट्सची टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक


ट्रम्प नाइट्सची टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत धडक
SHARES

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे ट्रम्प नाइट्स मुंबई नाॅर्थ ईस्ट संघाने सोबो सुपरसोनिक्सचा ४० धावांनी सहज पराभव करत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्यावहिल्या टी-२० मुंबई लीगच्या अंतिम फेरीत मजल मारली अाहे. सूर्यकुमारच्या ६३ धावांच्या खेळीमुळे ट्रम्प नाइट्सने क्वालिफायर-१ मधील या सामन्यात ६ बाद १६२ धावा उभारल्या. मात्र हे अाव्हान पार करताना सोबो सुपरसोनिक्स संघ सुरुवातीपासूनच अडखळत होता. त्यांच्या एकाही फलंदाजाला ३० पेक्षा अधिक धावा करता अाल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा डाव अवघ्या १२२ धावांमध्येच संपुष्टात अाला. अाता सुपरसोनिक्सला अंतिम फेरीत मजल मारण्याची दुसरी संधी मिळणार अाहे. सोमवारी रंगणाऱ्या नमो वांद्रे ब्लास्टर्स अाणि शिवाजी पार्क लायन्स यांच्यात रंगणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी सुपरसोनिक्सची गाठ पडणार अाहे.


ट्रम्प नाइट्सची संथ सुरुवात

बद्रे अालम रोहन राजे यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे ट्रम्प नाइट्सच्या फलंदाजांना पहिल्या पाॅवर-प्लेदरम्यान फटकेबाजी करता अाली नाही. शिखर ठाकूर अाणि शशांक सिंग यांनी ४० धावांची सलामी दिली. पण पुढील तीन षटकांत नऊ धावांच्या मोबदल्यात ट्रम्प नाइट्सचे तीन फलंदाज माघारी परतल्याने त्यांची अवस्था बिकट झाली होती. त्यापैकी दोन धक्के अभिषेक नायरने ट्रम्प नाइट्सला दिले होते. १५ षटकांत ट्रम्प नाइट्सने ९८ धावा केल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमारने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने पाच चौकार अाणि चार षटकारांची अातषबाजी करत या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साजरं केलं. त्यानंतर परिक्षीत वळसंगकर याने पाच चेंडूंत १ चौकार अाणि १ षटकारासह १३ धावांचे योगदान देत ट्रम्प नाइट्सला १६० धावांचा टप्पा अोलांडून दिला.


सुपरसोनिक्सची दांडी गुल

पहिल्याच चेंडूवर प्रतीक दाभोळखरने जय बिश्तला (०) माघारी पाठवले. त्यानंतर अारक्षित गोमेल (३२) अाणि प्रसाद पवार (२७) यांनी सुपरसोनिक्सला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. अादित्य धुमाळने तीन चेंडूंत प्रसाद पवार अाणि अभिषेक नायरला (०) बाद करत सुपरसोनिक्सला धक्के दिले. सुपरसोनिक्सचा हार्डहिटर सुजित नायकला सूर गवसला नाही. त्यामुळे ट्रम्प नाइट्सचे १६३ धावांचे अाव्हान पेलवणे त्यांना जमलेच नाही. ट्रम्प नाइट्सकडून कल्पेश सावंतने तीन तर प्रतीक दाभोळकर अाणि धुमाळने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.


हेही वाचा -

मुंबई टी-२० लीगला जाणवणार दिग्गज खेळाडूंची वानवा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा