Advertisement

ट्रम्प नाइट्सची मुंबई पँथरवरील विजयासह अग्रस्थानी झेप


ट्रम्प नाइट्सची मुंबई पँथरवरील विजयासह अग्रस्थानी झेप
SHARES

ट्रम्प नाइट्स मुंबई नाॅर्थ ईस्ट संघाने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात अालेल्या टी-२० मुंबई लीगमधील अापल्या शेवटच्या लीग सामन्यात नाॅर्थ मुंबई पँथर्सचा ३४ धावांनी पराभव करत अग्रस्थानी झेप घेतली अाहे. ट्रम्प नाइट्सने पाच सामन्यांत चार विजयांनिशी अाठ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले अाहे. ट्रम्प नाइट्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १७९ धावा उभारल्या. हे अाव्हान पार करताना नाॅर्थ मुंबई पँथर्सला ८ बाद १४५ धावांपर्यंतच मजल मारता अाली, त्यामुळे त्यांचे अाव्हान संपुष्टात अाले.


फलंदाजीत नाइट्सने केले बदल

बाद फेरीतील स्थान अाधीच निश्चित केल्यामुळे ट्रम्प नाइट्सने अाजच्या सामन्यात अनेक बदल केले. त्यांनी फलंदाजीचा क्रम बदलतानाच गेल्या सामन्यातील स्टार फलंदाज अाकाश पारकरला विश्रांती दिली. सलामीला त्यांनी शाहीद शेख (१९) अाणि शिखर ठाकूर (४१) यांना संधी दिली. त्यांनी अापल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडत ६ षटकांत ६१ धावांची सलामी दिली. शेख माघारी परतल्यानंतर ब्लास्टर्सच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट्स मिळवत ट्रम्प नाइट्सला अडचणीत अाणले. अखेर सुमित घाडीगावकरने १३ चेंडूंत ४ चौकार अाणि ३ षटकारांसह नाबाद ४१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली.


नाॅर्थ मुंबई पँथर्सची पडझड

वैभव सिंगच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई पँथर्सचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकांत माघारी परतले. यशस्वी जयस्वाल (२९) अाणि साईराज पाटील (३४) यांनी डाव सावरला खरा. पण त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश अाले. ठरावीक अंतराने त्यांच्या विकेट्स पडत गेल्यामुळे नाॅर्थ मुंबई पँथर्सला विजयासाठी ३४ धावा कमी पडल्या. वैभव सिंगने तीन तर अादित्य धुमाळने दोन विकेट्स मिळवल्या.


हेही वाचा -

नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा टी-२० मुंबई लीगला फटका!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा