Advertisement

IPL : बक्षीसाच्या रक्कमेत BCCI कडून कपात

बीसीसीआयच्या परिपत्रकानुसार, खर्चातील कपातीच्या प्रक्रियेअंतर्गत बक्षीसांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

IPL : बक्षीसाच्या रक्कमेत BCCI कडून कपात
SHARES

बीसीसीआयनं इंडियन प्रिमियर लीगच्या आगामी सत्रात अनेक खर्चात कपात केली आहे. आता तर विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम २०१९ च्या तुलनेत अर्धी केली आहे. बीसीसीआयनं एका जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये याची माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या परिपत्रकानुसार, खर्चातील कपातीच्या प्रक्रियेअंतर्गत बक्षीसांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.


विजयी संघाला १० कोटी

चॅम्पियन संघाला २० कोटी ऐवजी १० कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला १२ कोटी ५० लाख रुपयांऐवजी ६ कोटी २५ लाख रुपये दिले जातील. क्वालिफायनलमध्ये हरलेल्या दोन संघांपैकी प्रत्येकाला आता ४ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये मिळतील.


... म्हणून हा निर्णय घेतला

बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, सर्व फ्रेंचायजी चांगल्या परिस्थितीत आहेत. त्यांच्याकडे प्रायोजकत्व यासारखे उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. याच कारणामुळे बक्षिसाच्या रकमेबाबत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आयपीएल सामन्याचे आयोजन करणाऱ्या संघटनेला १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यात बीसीसीआय आणि फ्रेंचायजी मिळून ५० लाख रुपयांचं योगदान देतील.

याशिवाय बीसीसीआयच्या मध्य स्तरीय कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी जेथे 8 तासांपेक्षा कमी उड्डाण असेल, तेथे बिझनेस क्लासचे तिकीट मिळणार नाही.



हेही वाचा

फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख

'आयपीएल'ला कोरोना व्हायरसचा धोका?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा