Advertisement

क्रिकेटला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणितज्ञ टोनी लुईस यांचे निधन

क्रिकेटला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणितज्ञ टोनी लुईस (78) यांचे निधन झाले.

क्रिकेटला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणितज्ञ टोनी लुईस यांचे निधन
SHARES

क्रिकेटला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणितज्ञ टोनी लुईस (78) यांचे बुधवारी निधन झाले. लुईस यांनी सहकारी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्याबरोबर मिळून पावसामुळे प्रभावित होत असलेल्या क्रिकेट सामन्यासाठी १९९७ मध्ये डकवर्थ-लुईस ही पद्धत तयार केली. आयसीसीने इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ च्या विश्वचषकादरम्यान डकवर्थ-लुईस ही पद्धत स्वीकारली.

टोनी व फ्रँकच्या या पद्धतीला अनेक वेळा टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका गणितज्ञ स्टीवन स्टर्नने चालू स्कोरिंग-रेटनुसार या पद्धतीला पुन्हा तयार केले होते. त्यानंतर या नियमाला २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न म्हटले जाऊ लागले. लुईस क्रिकेटर नव्हते. मात्र, त्यांना क्रिकेट व गणितातील योगदानासाठी २०१० मध्ये ब्रिटिश सरकारकडून विशेष सन्मानाने गौरवण्यात आले होते.

१९९२ च्या विश्वचषकात इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य सामन्यानंतर निकालासाठी पद्धत बदलण्याचा विचार पुढे आला. त्या सामन्यात आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूंत २२ धावांची गरज होती. पावसामुळे सामना थांबवला. त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी १ चेंडूत २१ धावांची गरज असल्याचे दिसले. त्यानंतर डकवर्थ-लुईस पद्धत तयार करण्याचा विचार केला. याआधी आयसीसीच्या नियमानुसार, संघाच्या केवळ धावांची सरासरी पाहिली जात होती. म्हणजे, पावसापूर्वी अधिक सरासरीने ज्यांनी धावा काढल्या होत्या, ते विजयी ठरत होते. यात बळीचा विचार नव्हता. आता, डकवर्थ-लुईस नियमात पावसामुळे ज्या षटकापर्यंत दोन्ही संघांच्या धावांची सरासरी व बळींची संख्या गृहीत धरले जाते.



हेही वाचा

Coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात

काबा, मदिना बंद, तर भारतातील मशिदी का नाही?- जावेद अख्तर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा