हरवलेला मोबाइल १२ वर्षाच्या मुलाने स्वतःच शोधून काढला

कधीही स्मार्ट फोन वापरलेला नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सर्वत्र आँनलाईन शिक्षण दिले जात असल्याने तो इंटरनेच्या संपर्कात आला. याच इंटरनेटच्या माध्यमातून त्याने त्याचा हरवलेला मोबाइल शोधून काढला.

हरवलेला मोबाइल १२ वर्षाच्या मुलाने स्वतःच शोधून काढला
SHARES

तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही काय कराल? पोलिसात जाऊन एनसी दाखल कराल, मात्र फोन परत मिळेल याची खात्री तुम्हाला नसेलच. कारण अनेक कामं अडल्यामुळे दुसऱ्याच दिवशी तुम्ही नवीन मोबाईल विकत घ्याल. मात्र मुंबईच्या माहिम परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचा हरवलेला मोबाइल अवघ्या काही तासात शोधून काढला. विशेष म्हणजे  त्याने आजपर्यंत कधीही स्मार्ट फोन वापरलेला नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सर्वत्र आॅनलाईन शिक्षण दिले जात असल्याने तो इंटरनेच्या संपर्कात आला. याच इंटरनेटच्या माध्यमातून त्याने त्याचा हरवलेला मोबाइल शोधून काढला.

  हेही वाचाः- पाल्याच्या आॅनलाईन शिक्षणा दरम्यान घ्या काळजी, अन्यथा तुमची होऊ शकते फसवणूक

मंसूरचे आई आणि वडिल  दोघेही पोलिस असल्याने लहान पणांपासूनचं आरोपींना पोलिस कशा पद्धतीने शोधून काढतात याबाबत उत्सुकता असायची. मंसूरने या पूर्वी कधी स्मार्ट फोन वापरलेला नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे त्याचे सर्व शिक्षण हे आँनलाईन सुरू आले आणि मंसूर इंटरनेटच्या संपर्कात आला. मग काय दररोज शिक्षण घेताना, इंटरनेटवर इतर ही न कळणाऱ्या गोष्टींचा सर्च वाढला. अशातच मोबाइल चोरी आणि चोरांना कशा प्रकारे पकडायचे याची माहीती इंटरनेटवर पाहिली होती. मात्र १९ आॅगस्टला ज्यावेळी त्याचा चुलत भाऊ मुंबई सेंट्रल ते माहिम टॅक्सीने प्रवास करत होता. त्यावेळी त्याचा मोबाइल तो टॅक्सीत विसरला. त्यावेळी मंसूरने त्याच्या तल्लख बुद्धीचा वापर करून मोबाइल ट्रेस करण्यास सुरूवात केली. हे पाहून त्याच्या घरातल्यांनाही आश्रच्याचा धक्काच बसला. त्याने त्याच्या भावाला त्याच्या मोबाइलचा इएमइआय(IMEI) नंबर मागितला. त्यानुसार भावाने तो दिला. त्यानंतर अवघ्या ३५ मिनिटात त्याच्या भावाच्या मोबाइलचे लोकेशन हे मालाडजवळ दाखवतं होते. मंसूरने आपल्या आईच्या मालाडमध्ये राहणाऱ्या मैत्रिणी अर्चना भोसले आणि माधवी भोसले यांना त्या ठिकाणी जाऊन संबधित टॅक्सीवाल्यांला शोधण्यास सांगितले. मात्र ते पोहचे पर्यंत टॅक्सी पून्हा गोरेगावच्या दिशेने जात होती. गोरेगावच्या आॅबेराॅय माॅलजवळ टॅक्सीचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर अर्चना या पाठोपाठ तिथे पोहचल्या, मात्र टॅक्सी पार्किंगमध्ये उभी होती आणि चालक तो मोबाइल घेऊन निघून गेला होता.

हेही वाचाः- मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, पंतप्रधान मोदींनाच पत्र

त्यावेळी मंसूरने त्या मोबाइलवर चालकाला घाबरवण्यासाठी एक मेसेज पाठवला. त्यात त्याने मी एक पोलिस असून हा फोन माझा मुलीचा असल्याचा मेसेज पाठवला. तसेच मोबाइल पून्हा परत करा, त्यात मुलीचे काही महत्वाचे नंबर खासगी फोटो आणि व्हिडिओ आहेत. याचा दुरउपयोग केल्यास परिणाम वाईट होतील असा दमही भरला. त्या नंबरवर पून्हा फोन केला असता, तो फोन एका ६० वर्षीय टॅक्सी चालकाने उचलला. त्याने गोरेगाव येथे मंसूरच्या वडिलांना बोलावून मोबाइल सोपावला. जर मोबाइलच्या मालकाचा शोध लागला नसता तर तो मोबाइल तो टॅक्सीचालक त्यांच्या युनियनच्या कार्यालयात जमा करणार होता. त्या व्यक्तीला स्मार्ट फोन वापरताही येत नसल्याचे मंसूरच्या वडिलांकडून समजले. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणतिही तक्रार केली नाही. १२ वर्षाच्या मुलाने अवघ्या काही मिनिटात हरवलेला मोबाइल शोधल्याचे कळाल्यानंतर सायबर पोलिसांनीही त्याच्या या शोधकार्याची दखल घेतल्याचे सांगितले जाते.    

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा