महाराष्ट्र पोलिस दलात १८५ नवे रुग्ण, आतापर्यंत १८५ जणांचा कोरोनाने मृत्यू

आतापर्यंत एकूण १८,४०५ महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून १८५ जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात १८५ नवे रुग्ण, आतापर्यंत १८५ जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आही रस्त्यावर उभे आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील १ जवान दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आतापर्यंत एकूण १८,४०५ महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून १८५ जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


महाराष्ट्र पोलिस दलात आज, ११ सप्टेंंबर रोजीच्या अपडेटनुसार, पुन्हा १८९ नवे कोरोनाबाधित कर्मचारी आढळुन आले आहेत. यानुसार राज्य पोलिस दलातील आजवरच्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ४०५ इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील २४ तासात कोरोनामुळे १ पोलिस कर्मचार‍‍र्‍यांंचा मृत्यु सुद्धा झाला होता त्यामुळे कोरोनामृतांंचा आकडा १८५ इतका झाला आहे. आजवर आढळलेल्या १८,४०५ रुग्णांंपैकी १४ हजार ६०५ रुग्णांंनी आजवर या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर सद्य घडीला ३ हजार ६१२ कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती नियंत्रणात आहे. 

हेही वाचाः- दारूच्या परवान्यासाठी तळीरामांची गर्दी

कोरोना व्हायरस सुरु होताचा सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करण्यात आली होती त्यावेळेस पोलिस २४ तास कडक बंदोबस्तात गस्त घालत होते. मात्र मागील काही दिवसात अनेक प्रसंगात या अंतर राखा नियमाचा फज्जा उडत आहे. कंगना मुंबईत येण्याचा कालचा प्रकार असो वा रिया च्या चौकशी दरम्यान होणारी गर्दी प्रत्येक ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांना पुढे जावे लागत असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

हेही वाचाः- हृदयद्रावक घटना : आई पाठोपाठ पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा