२२०० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त, दोन निर्यातदारांवर छापा

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी वाढली आहे. मात्र, इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीरचा साठा केला जात असून ते काळ्या बाजारात विकले जात असल्याचं समोर आलं आहे.

२२०० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त, दोन निर्यातदारांवर छापा
SHARES

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी वाढली आहे. मात्र, इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.  रेमडेसिवीरचा साठा केला जात असून ते काळ्या बाजारात विकले जात असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत साठा करून ठेवलेली तब्बल २२०० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. 

पोलीस आणि अन्न व औषध संचालनालयाच्या पथकाने  औषधे निर्यात करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर सोमवारी रात्री छापे टाकले.  यामध्ये रेमडेसिविरच्या २२०० बॉटल जप्त केल्या आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त के लेल्या बॉटल अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. 

मरिन लाईन्स आणि मरोळ येथील दोन व्यावसायिकांकडे  रेमडेसिविरचा साठा असल्याची माहिती माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न व औषध संचालनालयातील अधिकाऱ्यांबरोबर रात्री या दोन्ही ठिकाणी छापा घातला. मरिन लाईन्स येथील व्यावसायिकाकडून २०० तर मरोळ येथील व्यावसायिकाकडून २०००  रेमडेसिविरच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. 

रेमडेसिविर उत्पादकांकडून या व्यावसायिकांनी परदेशी निर्यात करण्यासाठी ही इंजेक्शन घेतली होती. मात्र केंद्र सरकारने  रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी आणल्याने इंजेक्शन व्यावसायिकांकडेच पडून राहिल्या. मात्र, त्यांनी अन्न व औषध संचानालयाची परवानगी घेऊन रेमडेसिवीरचा साठा स्थानिक वापरासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. 



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा