26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद सुटला


26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद सुटला
SHARES

26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद लवकरच कैदेतून सुटणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाफीज सईद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील त्याच्या रहात्या घरीच नजर कैदेत आहे. मात्र, पाकिस्तानातील कोर्टाने हाफीज सईदला मुक्त करण्याचे आदेश दिल्याने भारतात तमाम भारतीयांची ही मोठी फसवणूक असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.


जानेवारी महिन्यापासून हाफीज नजरकैदेत

दरम्यान, जानेवारी 2017पासून हाफीज सईद नजरकैदेमध्ये आहे. त्याला आणखीन 3 महिने नजरकैदेमध्ये ठेवण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने न्यायालयाकडे मागितली. मात्र, 'हाफीज सईदविरोधात इतर कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का? नसेल तर त्याला लगेच मुक्त करा' असा आदेश लाहोर कोर्टातील न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला.


ही भारतीयांची फसवणूक

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भारताची आणि भारतीयांची फसवणूक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'पाकिस्तान सरकारकडून पुन्हा एकदा ही भारताची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. अमेरिकेने हाफीज सईदला याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे', असेही उज्ज्वल निकम यांनी नमूद केले.


पुरावे नसल्यामुळेच हाफीज मुक्त?

पाकिस्तान सरकारने दावा केला आहे की हाफीजविरोधात त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्या आधारावरच त्यांनी हाफीज सईदला नजरकैदेत ठेवले होते. मात्र, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार, पाकिस्तान सरकार न्यायालयात हाफीजविरोधात पुरेसे पुरावे सादर करू न शकल्यामुळेच न्यायालयाने त्याला सोडण्याचे आदेश दिले.


हाफीजवर 1 कोटी डॉलरचा इनाम

अमेरिकन सरकारने हाफीज सईदवर तब्बल 1 कोटी डॉलरचा इमान ठेवला आहे. मुबई हल्ल्यातील हाफीजचा सहभाग लक्षात घेता त्याच्यावर हा इनाम ठेवण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या लष्कर ए तैय्यबाची एक संघटना असलेल्या जमात उद दावाचा हाफीज सईद म्होरक्या आहे.हेही वाचा

26/11ची पुनरावृत्ती होणार?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा