कोकेन तस्करी प्रकरणी ३ परदेशी नागरिकांना अटक

हे तिघेही नायझेरियाचे रहिवाशी असल्याचे सांगितले जात असून या तिघांजवळून पोलिसांनी २२ लाखांचे कोकेन हस्तगत केले आहे.

कोकेन तस्करी प्रकरणी ३ परदेशी नागरिकांना अटक
SHARES

मुंबईतले पश्चिम उपनगर ड्रग्ज तस्करांचा मुस्क्या आवळण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून बांगूरनगर पोलिसांनी कोकेनची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. उचे जेम्स(३८), इमेका सायप्रियन, चुक्यु जोसेफ,  अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नायझेरियाचे रहिवाशी असल्याचे सांगितले जात असून या तिघांजवळून पोलिसांनी २२ लाखांचे कोकेन हस्तगत केले आहे.

हेही वाचाः- मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण

मालाडच्या टोयटा शोरूम  परिसरात एक व्यक्ती बुधवारी रात्री  १ वा. कोकेनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची महिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी  सापळा रचून उचे जेम्स याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्या अंग झडतीत पोलिसांना त्याच्याजवळ १०.१४ ग्रॅम कोकेन आढळून आले. ज्याची बाजारात किंमत १ लाख रुपये इतकी आहे. त्याच्या चौकशीत त्याच्यासोबत इतर दोन त्याचे साथीदार ही अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी मुंबईत आले असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना  राँयल पाम, गोरेगाव पूर्व येथून इमेका सायप्रियन, चुक्यु जोसेफ,  या दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाकडून १०४ ग्रॅम, तर दुसऱ्याकडून १०६ ग्रॅम कोकेन पोलिसांनी हस्तगत केले.

हेही वाचाः- महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

य तिघांकडून पोलिसांनी तब्बल २२०.१४ ग्रॅम कोकेन हस्तगत केले असून बाजारात त्याची किंमत २२ लाख १ हजार ४०० रुपये इतकी आहे. या तिघांवर पोलिसांनी कलम २१ क, २९एनडीपीएस अँक्ट १९८५ अंतर्गत कारवाई केली असून पोलिस या तिघांमार्फत त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा