देवनार कत्तलखान्यातून बकरे चोरणाऱ्या तिघांना अटक


देवनार कत्तलखान्यातून बकरे चोरणाऱ्या तिघांना अटक
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठा कत्तलखानाा अशी ओळख असलेल्या देवनार कत्तलखान्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून बकऱ्यांची आवक केली जाते. बकरी ईदनिमित्ताने तर दरवर्षी इथं १ ते दीड लाख बकरे आणले जातात. २२ आॅगस्ट रोजी बकरी ईद असल्याने देवनार कत्तलखान्यात बकरे दाखल होऊ लागले आहेत. याच संधीचा फायदा घेत इथल्या बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा देवनार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.


'अशी' करायचे चोरी

देवनार कत्तलखान्यात दररोज ६ हजार जनावरांची कत्तल होते. तर बकरी ईदनिमित्त लाखो रुपयांची बोली लाऊन बकऱ्यांची विक्री होते. सद्यस्थितीत राजस्थान, मध्यप्रदेश, यूपी, बिहार आणि इतर राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात बकरे घेऊन देवनार कत्तलखान्यात येत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस बकऱ्यांना गुंगीचं इंजेक्शन देऊन फैजल उर्फ नझीर अहमद कुरेशी (२८), कुदरत उर्फ पाया अब्दुल हाजी शेख (१८), रिहान नाझीर शेख (२९)हे तिघेजण बकऱ्यांची चोरी करायचे आणि याच चोरीच्या बकऱ्या पुन्हा चढ्या दरात बाजारात विकायचे.


व्यापाऱ्यांनी पकडलं

गुरूवारी मध्यरात्री हे तिघेही बकरे चोरण्यासाठी देवनार कत्तलखान्यात गेले होते. एका व्यापाऱ्याचा डोळा लागल्याचं पाहून हे तिघेही बकरे चोरायचा प्रयत्न करू लागले. याच प्रयत्नात बकऱ्याच्या आवाजामुळे व्यापाऱ्याची झोप उडाल्याने या तिघांची चोरी पकडली गेली. तिघेही पळण्याच्या तयारीत असताना व्यापाऱ्यांनी त्यांना पकडून देवनार पोलिसांच्या हवाली केलं.


पोलिस कोठडी

या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही बकरी चोरी प्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती देवनार पोलिसांनी दिली. या तिघांना न्यायालयाने १८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

'देवनार कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांची कत्तल नको’, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पार्किंग वादातून १ वर्षाची शिक्षा

पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा