मोटरमनशी थट्टा पडली महागात, ३ तरूण गजाआड

तीन तरूणांनी विक्रोळी स्थानकावर लोकल थांबल्यावर ही लोकल चालवणाऱ्या मोटरमनची टेर खेचण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २०१७ मधील असून व्हायरल व्हिडियो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणून आपली बदनामी केल्याप्रकरणी मोटरमनने पोलिसांत तात्काळ गुन्हा नोंदवला.

SHARE

मध्य रेल्वे मार्गावर लोकल चालवणाऱ्या मोटरमनची थट्टा करून त्याचा गंमतीशीर व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तिघांना ही थट्टा चांगलीच महागात पडली आहे. मोटरमनने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी या तिघांनाही शुक्रवारी अटक केली.
कुणाचा समावेश?

राहुल गोडसे, शुभम शुक्ला आणि अभिषेक कुणीयाल अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर ट्रेस पासिंगसह सरकारी कर्मचाऱ्याची टिंगलटवाळी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात अाला आहे.


यु ट्यूबवरील चॅनलसाठी

या तिघांनी यु ट्यूबवर 'टीम ब्लंड' नावाचं चॅनल सुरू केलं होतं. नागरिकांना घाबरवणारे, त्यांची थट्टा करणारे प्रँक व्हिडियो तयार करून हे तिघेही या चॅनलवर ते व्हिडियो अपलोड करायचे. निवांत बसलेल्या नागरिकांच्या अंगावर साप टाकून त्यांना घाबरवण्याचे प्रकारही त्यांनी केले आहेत.

त्यानंतर त्यांनी विक्रोळी स्थानकावर लोकल थांबल्यावर ही लोकल चालवणाऱ्या मोटरमनची टेर खेचण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २०१७ मधील असून व्हायरल व्हिडियो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणून आपली बदनामी केल्याप्रकरणी मोटरमनने पोलिसांत तात्काळ गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.हेही वाचा-

फेसबुकवरील फ्रेंडशिप पडली महागात!

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मॅसेज, तरूणाला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या