जुहूच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

  Juhu
  जुहूच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
  मुंबई  -  

  जुहू समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या वेळेस पोहण्यासाठी गेलेल्या एका 32 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. तुषार खांडविलकर असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून अग्निशमन आणि एनडीआरएफ जवानांचे शोधकार्य सुरू आहे.

  जुहू चौपाटीवर 11 जण दुपारच्या सुमारास सांताक्रूझ येथून फिरण्यासाठी आले होते. त्यामध्ये तुषारचा देखील समावेश होता. प्रत्येकजण चौपाटीवर मौजमजा करत असताना तुषार समुद्रात जाऊन पोहण्याचा प्रयत्न करू लागला.

  भरतीची वेळ असल्याने समुद्रात उंच आणि जोरदार लाटा उसळत होत्या. शिवाय वारेही वेगाने वाहत होते. तुषारला पोहता येत नसल्याने तो लाटांच्या तडाख्यात सापडला आणि अचानक खोल समुद्रात ओढला गेला.

  तो दिसेनासा झाल्यावर त्याच्या ओळखीच्या लोकांनी त्वरीत या घटनेची माहिती लाईफगार्डला दिली. लाईफगार्डने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तुषारचा शोध न लागल्याने त्वरीत फायर कंट्रोलला फोन लावण्यात आला.  हे देखील वाचा -

  पावसाळ्यात समुद्र किनारी जाताय? मग हे वाचाच!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.