कांदिवलीत खळ्ळ्खट्याक: ४ मनसैनिकांना अटक

कांदिवलीतील एम. जी. रोड परिसरात राजूभाई ढोकळावाला हे फरसाणचं दुकान असून या दुकानावर गुजरातीत पाटी लावण्यात आली होती. ही पाटी हटवण्याविषयी दुकानमालक राजू ढोकळावाला याला सांगूनही त्याने पाटी न हटवल्याने आक्रमक मनसैनिकांनी ही पाटी तोडल्याची माहिती कांदिवलीचे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी दिली.

कांदिवलीत खळ्ळ्खट्याक: ४ मनसैनिकांना अटक
SHARES

सोमवारी दुपारी कांदिवलीतील दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४ कार्यकर्त्यांना कांदिवली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर फरार कार्यकर्त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात मुंबईतील अनेक भागांत दुकानांच्या पाट्या नियमबाह्यपणे गुजरातीतून लावल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार रविवारी रात्रीच काही मनसैनिकांनी वसईतील गुजरातीमध्ये लिहिलेल्या दुकानाच्या पाट्या तोडल्या. तर कांदिवलीत देखील सोमवारी दुपारी अशीच तोडफोड केली.

बघा, अशी केली तोडफोड

कुणाचं दुकान फोडलं?

कांदिवलीतील एम. जी. रोड परिसरात राजूभाई ढोकळावाला हे फरसाणचं दुकान असून या दुकानावर गुजरातीत पाटी लावण्यात आली होती. ही पाटी हटवण्याविषयी दुकानमालक राजू ढोकळावाला याला सांगूनही त्याने पाटी न हटवल्याने आक्रमक मनसैनिकांनी ही पाटी तोडल्याची माहिती कांदिवलीचे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी दिली.

याप्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी भादंवि अंतर्गत कलम १६७/१८ नुसार १० मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला. त्यातील ४ जणांची ओळख पटली असून त्यांना अटक केल्याची माहिती कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकूंद पवार यांनी दिली.

हेही वाचा-

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा