वांद्रेतून ४२ किलोचा गांजा जप्त, हैद्राबादमधील १९ वर्षीय तरुणाला अटक

मुंबईत नवी मुंबई, गुजरात मार्गे ड्रग्ज आणणाऱ्या तस्करांनी आता हैद्राबात मार्गे ड्रग्ज आणण्यास सुरूवात केली. मात्र याची कुणकुण देखील मुंबई पोलिसांना लागली.

वांद्रेतून ४२ किलोचा गांजा जप्त, हैद्राबादमधील १९ वर्षीय तरुणाला अटक
SHARES

मुंबईत सुशांत सिंह राजपूत प्रकरणा अमली पदार्थ तस्करीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर पोलिस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तस्करांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका तस्कराला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ पथकाच्या विभागाने वांद्रे येथून अटक केली आहे. मोहम्मद ताज शेख असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वांद्रे अमली पदार्थ विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात अनेक बड्या सेलिब्रिटिंची नावे पुढे आल्यानंतर पोलिस आणि एनसीबीने त्यांची चौकशीही केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली. त्यामुळे मुंबईत नवी मुंबई, गुजरात मार्गे ड्रग्ज आणणाऱ्या तस्करांनी आता हैद्राबात मार्गे ड्रग्ज आणण्यास सुरूवात केली. मात्र याची कुणकुण देखील मुंबई पोलिसांना लागली. मुंबईच्या वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याची माहिती वांद्रे अमली पदार्थ विभागाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीचे पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे यांची सापळा रचला.

हेही वाचाः- बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

वांद्रे येथील के.सी.रोडवर एक व्यक्ती डिलव्हरी देण्यासाठी येणार असल्याने पोलिस त्या ठिकाणी सतर्क होते. त्यावेळी ताज शेख याच्या हालचालीवर पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, त्याची अंग झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्याच्याजवळ ४२ किलोचा गांजा मिळून आला. बाजारात या गांजाची किंमत ८ लाख ५० हजार इतकी आहे. अवघ्या १९ वर्षाचा असलेला ताज हा फक्त मोहरा असून त्यामागे मुख्यसूत्रधार हा वेगळाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा