समलैंगिक संबंधातून मित्राची हत्या


समलैंगिक संबंधातून मित्राची हत्या
SHARES

समलैंगिक संबंधातून एका कम्प्युटर इंजिनीअरने आपल्याच मित्राची हत्या केल्याचं प्रकरण वांद्र्यात पुढे आलं आहे. धवल उनाडकट (२५) असं या आरोपीचं नाव असून मृत तरूणाचं नाव पार्थ रावल असं आहे. पार्थचे दुसऱ्या एका तरूणासोबत संबंध असल्याच्या रागातून धवलने त्याची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.


तिघांमध्ये समलैंगिक संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाचा हाॅटेल व्यवसाय सांभाळणाऱ्या धवलची मैत्री पार्थ आणि मोहम्मद आसिफ नावाच्या तरूणांसोबत सोशल मीडियावरून झाली होती. त्यानंतर त्यांच्यांत समलैंगिक संबंध तयार झाले. परंतु काही दिवसांनी झालेल्या एका झगड्यानंतर धवलने आसिफचं सोशल मीडिया अकाऊंट ब्लाॅक करून त्याचा फोन उलचलणं बंद केल्याची माहिती आसिफने पोलिसांना चौकशी दरम्यान दिली.


रागातून हल्ला

त्यानंतर रविवार ४ नोव्हेंबर रोजी धवल जेव्हा आसिफच्या वांद्र्यातील हिल रोड येथील घरी गेला, तेव्हा तिथं पार्थ बघून धवलचा संताप अनावर झाला. यावरून तिघांमध्ये झगडा सुरू झाला. याच दरम्यान धवलने पार्थच्या डोक्यावर कँडल स्टँडचा जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात पार्थ गंभीर जखमी झाला.


झोपेत मृत्यू

तेव्हा भानावर येऊन धवल आणि आसिफने पार्थला जवळच्या होली फॅमिली रुग्णालयात दाखल केलं. परंतु पार्थने टाके घालण्यास मनाई केल्याने डाॅक्टरांनी त्याला त्वरीत लिलावती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. लिलावतीत प्रथोमोपचार करून आसिफ पार्थला घेऊन दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आला आणि त्याला बेड रूममध्ये झोपवलं. तसंच तो स्वत: दुसऱ्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेला. धवल देखील आपल्या कांदिवलीतील घरी निघून गेला.

सायंकाळी ६ वाजता आसिफने जेव्हा पार्थला उठवण्याचा प्रयत्न केला; तेव्हा पार्थने त्याला प्रतिसाद न दिल्याने आसिफने त्याला पुन्हा लिलावतीत दाखल केलं. परंतु डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.


६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

त्यानंतर वांद्रे पोलिसांनी रात्री ९ वाजता आसिफच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत धवलला कांदिवलीतील घरून ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

EXCLUSIVE : जुगार खेळताना सेलिब्रिटींची मुले सापडली; बाबा सिद्दीकींच्या मुलाचा समावेश

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी जेरबंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा