एलटीटी स्थानकाबाहेर तरुणानं झाडाला घेतला गळफास


एलटीटी स्थानकाबाहेर तरुणानं झाडाला घेतला गळफास
SHARES

मुंबईच्या दादर स्थानकाबाहेरील स्कायवाॅकला एका कर्जबाजारी व्यक्तीनं गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच कुर्लाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे स्थानकाबाहेर बुधवारी एका तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणाची ओळख अद्याप पटली नसून त्याच्या बॅगेत महिंद्र शाहू (३३) या नावाची कागदपत्रं आढळून आली आहेत. या तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.


सकाळी केली अात्महत्या

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीत या तरुणाने सकाळी साडेसातच्या सुमारास या परिसरात कुणी नसताना आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मृत आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशच्या बांदा येथील असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. या व्यक्तीकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी त्याच्या ओळखींच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या खिशात सुसाइड नोटही मिळाल्याचे सांगण्यात येते. तूर्तास मृताची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.


हेही वाचा -

'त्या'ने अनुभवला ट्रेनखाली झोपून अात्महत्या करण्याचा थरार...

गजबलेलं दादर स्थानक अन् लाेंबकळणारा मृतदेह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा