फरार कैद्याला तीन वर्षांनी अटक

  Mumbai
  फरार कैद्याला तीन वर्षांनी अटक
  मुंबई  -  

  खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फरार कैद्याला पुन्हा अटक करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. 2014 साली पॅरोल मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. यतेंद्रसिंग चौहान असे या गुन्हेगाराचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे.


  दोषीला कशी झाली पुन्हा अटक?

  वांद्रे पोलिस ठाण्याच्या हद्दीत यतेंद्रसिंगने गोळी घालून एका व्यक्तीची हत्या केली होती. अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चौहानला जून 2014 मध्ये पॅरोल मिळाला होता. मात्र, पॅरोलची रजा संपूनदेखील आरोपी कारागृहात न परतता तो पळून गेला. नाशिक रोड पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, गुन्हे शाखेने फरार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. याच दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांना यतेंद्रसिंघ चौहानबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती.

  त्यानंतर, पोलिसांनी सतत तीन महिने त्या फरार आरोपीच्या मागावर राहून त्याच्याबद्दलची माहिती मिळवली असता तो कानपूरमध्ये नोकरी करत होता. त्यानुसार, गुन्हे शाखेने एक पथक कानपूर येथे रवाना करून सात दिवस शाळेवर निगरानी ठेवून अखेर यतेंद्रसिंह चौहान लाखा याला अटक केली.  हेही वाचा - 

  जे. जे. रुग्णालयातून कैदी फरार


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.