व्यावसायिकाचे नग्न रेकॉर्डींग करून मागितली खंडणी


व्यावसायिकाचे नग्न रेकॉर्डींग करून मागितली खंडणी
SHARES

सोशल मिडियावर डेटींग अँपलिकेश वापरत असला, तर सावधान अशा डेटिंग अँपलिकेशनच्या मदतीने  उद्या तुम्हालाही ब्लॅकमेल करून खंडणीचा फोन येऊ शकतो. नुकताच असा प्रकार मरीनड्राइव्हच्या एका बड्या व्यावसायिकासोबत घडला आहे. डेटिंग अँपवर ओळख झालेल्या मुलीने व्यावसायिकाचे नग्न रेकाँर्डिगकरून चक्क पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय महिलेवर मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

जीएसटी अधिक्षकाला सायबर खंडणीची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका  चहाच्या कंपनी मालकालाकडेही सायबर खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार व्यावसायिकाने ‘OK Copid’ या डेटींग अप्लिकेशनद्वारे त्याची ओळख रिद्धी श्रीवास्तव नावच्या २५ वर्षीय तरुणीशी झाली होती. तेथे बरेच काळ चॅटींग केल्यानंतर तिने तक्रारदाराकडे त्याचा मोबाईल क्रमांक मागितला. तो दिल्यानंतर ११ जानेवारीला तक्रारदाराला त्या तरूणीचा व्हिडिओ कॉल आला. तेथे बोलणे सुरू असताना तरुणीने त्याला नग्न होण्यास सांगितले. तक्रारदार नग्न झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग करण्यात आली. त्यानंतर त्याला धमकीचा दूरध्वनी आला. तुझे रेकॉर्डिंग करण्यात आले असून बदनामी टाळायची असल्यास आरोपीने पैशांची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. डेटिंग अॅप्लिकेशनवर मैत्री करणारी तरूणी प्रत्यक्षात सायबर खंडणी मागणा-या टोळक्याची सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी समाज माध्यमांवर त्याची छायाचित्र अपलोड करून त्याची बदनामी केली.

हेही वाचाः- या आठवड्यात मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार?

या प्रकरणांनंतर तक्रारदाराने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३८४(खंडणी), ५०३(बदनामी करण्याची भीती दाखवून धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी फेसबुवर महिलेसोबत झालेल्या मैत्रीनंतर तिने नग्न अवस्थेत वॉट्सअॅप कॉल करून त्याच्या चित्रीकरणाच्या सहाय्याने वस्तू व सेवा कर(जीएसटी) अधिक्षकाकडे पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जीएसटी अधिक्षकाच्या तक्रारीनंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे फेसबुकवर मैत्री करून नग्न व्हिडिओ कॉलद्वारे खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. बदनामीच्या भीतीने अनेकजण त्यांना परस्पर पैसे देतात. अनेकवेळा ही खंडणी आभासी चलनामध्ये(क्रीप्टोकरन्सी) मध्ये मागण्यात येते. त्यामुळे पैसे भरल्यानंतरही आरोपीचा माग काढणे कठीण होऊन बसले. त्यामुळे नागरीकांना अशा प्रकारांना बळी पडून नये, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा